Pune News : सुट्टीवर असतानाही अग्निशमन दलाच्या जवानाने बजावले कर्तव्य; विझवली आग

एमपीसी न्यूज : काल राञी मोबाईल दुकानामध्ये लागलेल्या आगीची घटना ताजी असताना आज शुक्रवार रात्री दहाच्या सुमारास काञज, दत्तनगर, बेलदरे पेट्रोल पंपाशेजारी एका छोट्या मोबाईल दुकानात आगीची घटना घडली. देवदूत जवानाने दाखवलेल्या प्रसंगवधानाने इतरञ आग न पसरता मोठा धोका टळला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे अग्निशमन दलाच्या कोंढवा येथे ड्युटीस असलेले व काञजमधे राहणारे देवदूतचे जवान राहुल सुभाष जाधव यांची शुक्रवारी सुट्टी असल्याने ते बेलदरे पेट्रोल पंपानजीक एका मिञाकडे आले होते. त्यावेळी त्यांना नागरिकांचा आरडाओरडा ऐकू येताच त्यांना तेथे दुकानामध्ये आग लागल्याचे दिसले. त्यांनी तातडीने धाव घेत सदर दुकानाचे कुलूप तेथील एका दगडाच्या साह्याने तोडले व अग्निशमन दलाला तातडीने आगीची घटना कळविली. काञज अग्निशमन केंद्रातील वाहन येईपर्यंत जवान राहुल  जाधव यांनी पेट्रोल पंप जवळ असल्याचे गांभीर्य ओळखून तेथीलच अग्निरोधक उपकरणाचा वापर करत आग आटोक्यात आणली व धोका दुर केला.

त्याचवेळी तिथे काञज अग्निशमन दलाचे वाहन येऊन जवानांनी पाण्याचा मारा करत आग पुर्ण विझवली. उपस्थित नागरिकांनी जवान राहुल जाधव यांनी सुट्टीवर असताना देखील दाखवलेल्या कर्तव्याचे कौतुक केले. जवान राहुल जाधव यांचे वडिल सुभाष जाधव हे देखील पुणे अग्निशमन दलाकडे प्रभारी अधिकारी असून ते राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.