Pune : जे नेते आज ठराव करत आहेत त्यांच्यामुळेच कॉंग्रेसची ही परिस्थिती

काँग्रेस मधील निम्हणांच्या विरोधातील ठरवा नंतर विनायक निम्हण यांचं परखड मत 

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असणारे आमदार विनायक निम्हण यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका घेत कॉंग्रेस पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ठराव मंजूर केला आहे. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधील दोन माजी शहराध्यक्ष तसेच इतर जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बैठक घेतली. त्या बैठकीत हा ठराव मंजूर करून शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षातील वरिष्ठांना आव्हान दिल आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सहमतीने निम्हण यांना पक्षात घेण्याचा निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची वेळ अद्याप ठरलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर प्रतिक्रिया उमटली आहे. या बैठकीला चाळीसहून अधिक पदाधिकारी, आजी-माजी आमदार, नगरसेवक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

तर या ठरवला विनायक निम्हण यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिल आहे. मला भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांची ऑफर आहे. त्यामुळे मीच निर्णय घेणार अस विनायक निम्हण यांनी स्पष्ट केल आहे. तर आज शहरमध्ये कॉंग्रेसच अस्तित्व दिसत नाही तेव्हा यांनी पक्षासाठी केल तरी काय ? जे नेते आज ठराव करत आहेत त्यांच्यामुळेच आज हि परिस्थिती आज कॉंग्रेसवर उद्भवली आहे. तेव्हा या नेत्यांनी बोलू नये. अस कार्यकर्त्यांच मत आहे अस विनायक निम्हण म्हणाले आहेत. तर मी पुढील १ महिन्यानंतर काय करायचं याचा निर्णय घेणार असल्याच देखील विनायक निम्हण म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.