Pune : हा ‘लाईट बॉक्स’ करतो वस्तूंचे 100 टक्के निर्जंतुकीकरण ; पुण्याचे आनंद ललवाणी यांचे संशोधन

This 'Light Box' does 100% disinfection.

एमपीसी न्यूज –  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आनंद ललवाणी यांनी 100 टक्के निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम असलेल्या ‘लाईट बॉक्स’ विकसित केला आहे.

जगभरात पसरलेल्या कोविड -19 च्या संसर्गात स्वच्छता हा एकमेव सुरक्षेचा उपाय आहे. परंतु धातूच्या वस्तू किंवा अन्य वस्तू केवळ साबणांनी स्वच्छ होत नसल्याने त्यांना पूर्णतः निर्जंतुक करणे अवघड असते.

या समस्येवर तोडगा काढत पुण्याचे आनंद ललवाणी यांनी अनोखा ‘लाईट बॉक्स’ विकसित केला आहे. भारतीय प्रयोगशाळेत हे उपकरण तपासून संबंधित उपकरण 100 टक्के निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम असल्याचे सिध्द झाले आहे.

ललवाणी हे अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापीठातून ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग’ मध्ये पीएचडी करत असून सध्या लाॅकडाऊनमुळे ते पुण्यातच राहतात.

ललवाणी यांनी सांगितले की, मानवी शरीर व खाद्यपदार्थ सोडून इतर सर्व वस्तूंचे 100 टक्के निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम असलेले हे एकमेव उपकरण बाजारात उपलब्ध आहे.

या उपकरणचा लहान व मध्यम व्यवसायातील उपकरणे तसेच घरगुती वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास उपयुक्त आहे.

ललवाणी पुढे म्हणाले, ‘कोरोना’ संसर्गाच्या काळात घरातील व कामाच्या ठिकाणी असणाऱ्या वस्तू पटकन निर्जंतुक करणे आवश्यक आहे. या उपकरणाच्या सहाय्याने अवघ्या 30 सेकंदात वस्तूंचे निर्जंतुकीकरण करता येते.

‘यूव्ही-सी’ लाईट च्या मदतीने अगदी दागिने, नोटा, इलेक्ट्रोनिक वस्तू यांनासुद्धा स्वच्छ केले जाऊ शकते. खास भारतीयांची गरज ओळखून बनविण्यात आलेले हे उपकरण संपूर्णपणे भारतीय बनावटीचे असून वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.

‘यूव्ही-सी’ लाईटने त्वचेचा कर्क रोग होत असल्याचे सर्वज्ञात आहेच, त्यामुळे या उपकरणाचा मानवी शरीराबरोबर संपर्क टाळावा असे  त्यांनी सांगितले आहे.

# कोण आहेत आनंद ललवाणी ?

मुळचे पुणे येथील रहिवासी असणारे आनंद ललवाणी अमेरिकेतील कॅलीफोर्निया येथील स्टॅन्फोर्ड विद्यापीठातून ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग’ मध्ये पीएचडी करत आहेत.

पीएचडी करत असताना एका जागतिक स्पर्धेमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ या विषयावर महत्वपूर्ण माहिती देणारा त्यांनी प्रकल्प सादर केला होता, या प्रकल्पाला एक लाख डॉलर्सचा पुरस्कारही मिळाला होता.

तसेच 2018 मध्ये अमेरिकेच्या ‘आयव्ही लीग’ मधील ब्राऊन विद्यापीठात शिकत असताना वयाच्या 22 व्या वर्षी बनवलेला एक उपग्रह नासाद्वारे अंतरिक्षात सोडण्यात आला होता. तो उपग्रह आजही अंतरिक्षात कार्यरत असून पृथ्वीवरून ट्रॅक करता येत असल्याचे ललवाणी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.