National Election : यंदा पुन्हा भाजपा नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येणार ; सर्व एक्झिट पोलचा अंदाज

आठ पैकी सहा एक्झिट पोल म्हणतात एनडीएला मिळेल स्पष्ट बहुमत

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा संपला आणि काउंट डाऊन सुरू झाले. आज सायंकाळी अंतिम चरणातील मतदान प्रक्रिया पार पडताच टिव्ही वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल दाखविण्यास सुरुवात केली. वेगवेगळे एक्झिट पोल वेगवेगळे आकडे दाखवित असले तरी यंदाचे सरकार हे संपूर्ण बहुमताचे येणार नसून भाजपाला मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार हे निश्चित. त्यामुळे यंदा भाजपा नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येणार असेच विश्लेषण या सर्वच एक्झिट पोलमधून निघत आहे.

सी वोटर, टाईम्स नाऊ वीएमआर, झी पोल डायरी, रिपब्लिक जन की बात, सुवर्णा न्यूज, इंडिया न्यूज पोल स्टार्ट, एबीपी निलसन आणि इंडिया टुडे यांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आहे.  या आठपैकी सहा एक्झिट पोल भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होईल असे सांगतात. तर काँग्रेसप्रणित युपीए आघाडीने भाजपाला बाहेर बसविण्यासाठी सर्व पक्षांची मदत घेण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. ते पाहता एबीपी नेल्सन आणि न्यूज एक्सने अधांतरी लोकसभेचा अंदाज वर्तविला आहे.

थोडक्यात या निवडणुकीत पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाच्या पारड्यात स्पष्ट बहुमत पडणार नसल्याचे एक्झिट पोल वर्तवित आहेत. त्यामुळे निकालांची उत्सुकता आता अधिकच ताणली गेली आहे. अनेकांनी एनडीएचे सरकार येणार असे वर्तविले असले तरी हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे सरकार कसे कार्य करेन हे पाहण्यासाठीही राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. मोदी अटलजींच्या भूमिकेत जातील का त्यांचे वागणे पूर्वीप्रमाणेच असेल हे जाणण्यासाठी अनेकजण उत्सूक आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.