Pimpri Chinchwad Idol : यंदा ‘पिंपरी-चिंचवड आयडॉल’ स्पर्धा होणार; नावनोंदणीचे आवाहन

एमपीसी न्यूज –  कोरोना महामारीमुळे दोन वर्षाच्या खंडानंतर (Pimpri Chinchwad Idol) यंदा पुन्हा एकदा नव्या दमाने पिंपरी-चिंचवड आयडॉल 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड आयडॉल ‘मोरया करंडक’ चे हे 7 वे वर्ष आहे. त्यासाठी कलाकारांना नावनोंदणी करण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. स्पर्धेचा वयोगट 15 ते 35 वर्षे असा असून फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2022 असणार आहे.  

पिंपरी-चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेस गेली 6 वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील काही स्पर्धकांनी ‘सूर नवा ध्यास नवा’, झी सारेगमप तसेच अशा अनेक स्पर्धांमध्ये गायक म्हणून पारितोषिक मिळविले आहेत. या स्पर्धेमधील अनेक स्पर्धक व्यावसायिक रंगमंचावर गायक म्हणून नाव कमवीत आहेत.

Pune Palkhi Sohala : संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यात भाजपाकडून जंगी स्वागत

गेली दोन वर्षे कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे स्पर्धेमध्ये खंड पडला होता. परंतु, आता पुन्हा एकदा नव्या दमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे नवोदित कलाकारांना उर्जा मिळणार आहे. यंदाचे पिंपरी-चिंचवड आयडॉल ‘मोरया करंडक’ चे हे 7 वे वर्ष आहे. स्पर्धेचे फॉर्म सर्व्हे नं.164 ‘मनिषा स्मृती निवास’ भोईर नगर चिंचवड येथे उपलब्ध आहेत. फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख बुधवार 5 जुलै 2022 (वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7) आहे.

या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक भाऊसाहेब भोईर हे (Pimpri Chinchwad Idol) आहेत. आयोजन हर्षवर्धन भोईर यांनी केले असून संयोजिका मानसी भाऊसाहेब भोईर- घुले आणि सुषमा बोऱ्हाडे-खटावकर या आहेत.  या स्पर्धेचे संगीत संयोजन मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत ‘रजनीगंधा’चे वादक करतील. अधिक माहितीसाठी 9822607687 आणि 9822313066 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेचा वयोगट 15 ते 35 वर्षे असा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.