Pune : शिवजयंतीला यंदा ८५ स्वराज्यरथांची मानवंदना

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजन : संगीतकार अजय अतुल, महापौर मुरलीधर मोहोळ यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते लालमहाल येथून मिरवणुकीला होणार प्रारंभ 

एमपीसी न्यूज – शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सालाबाद प्रमाणे शिवजयंतीला बुधवारी दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा ८ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ८५ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्टय असणार आहे, अशी माहिती समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.  

सोहळ्याचे उद््घाटन सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल, महापौर मुरलीधर मोहोळ, फते शिकस्त टीमचे दिग्पाल लांजेकर, अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, संग्राम थोपटे, संजय जगताप, भीमराव तापकीर तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण परदेशी उपस्थित रहाणार आहेत.

समितीच्या जिजाऊ मांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडू शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप,

सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे,

जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, सरदार, पिलाजीराव शिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, सरदार भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,

शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपापला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी होणार आहेत.

युद्धकला सादर करणा-या ५१ रणरागिणींचे पथक होणार सहभागी

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणा-या ५१ रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. शिवगर्जना ढोलताशा पथक, ५१ रणशिंग, ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक सहभागी होणार आहे. सोहळ्यामध्ये वीर येसाजी कामठे यांच्या पुतळ्याचे तसेच प्रतापगड युध्दवीर कृष्णाजी उर्फ रणबंकी गायकवाड यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.

सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, दीपक घुले, दिग्वीजय जेधे, शंकर कडू, महेश मालुसरे, नीलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, प्रवीणभैय्या गायकवाड, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे. पुणेकरांनी मोठया संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर सलग ९ व्या वर्षी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवजयंती महोत्सव समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड देणार मानवंदना. एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यावर सकाळी ११ ते १२ या वेळेत ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पुष्पवृष्टीचे यंदा ९ वे वर्ष आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like