Pune : शहरातील कोकणवासियांसाठी यंदाचा गणेशोत्सव प्रवास होणार टोलमुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड व पुणे या शहरातून दरवर्षी जवळपास दोन ते अडीच लाख भाविक कोकणात जात असतात. ही भाविकांची सोय टोलमुक्त व्हावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अजय पाताडे यांनी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार कोकणात जाणा-या भाविकांकरिता टोलमाफी मिळवून दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांच्या सोयीसाठी वाहनांना टोलमाफीचा निर्णय जाहीर केला होता. या टोलमाफीमध्ये मुंबई, ठाणे व नाशिक या परिसरातील नागरिकांना लाभ होत होता. परंतु पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील कोकणवासियांना याचा लाभ होत नव्हता.

कोकणात जाणा-या भाविकांची गैरसोय टाळण्याकरिता त्यांच्या वाहनांना टोलमाफी मिळावी अशी मागणी अॅड. सचिन पटवर्धन यांनी केली. पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी संपर्क साधून पिंपरी-चिंचवड व पुण्यातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांकरिता टोलमाफी मिळवून दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे या शहरांमधून कोकणांत जाणा-या  भाविकांची गैरसोय टळली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.