Chikhali News: ‘त्या’ सोसायटीधारकांनी मानले आमदार महेश लांडगे यांचे आभार!

एमपीसी न्यूज – सोसायटीधारक, बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांच्यात असलेल्या सक्षम समन्वयाअभावी सोसायटीधारक रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी या समस्यांचा तात्काळ पाठपुरावा करीत सोसायटीधारकांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. याबाबत सोसायटीधारक प्रतिनिधींनी लांडगे यांचे आभार मानले आहेत.

चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटीच्या माध्यमातून सोसायटीधारक नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पार्किंग, वीज पुरवठा यांसह पायाभूत सोयी-सुविधांबाबत बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी अडवणूक, सोसायटीधारकांना महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळणारी दुय्यम वागणूक अशा विविध  मुद्यांवर आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकारी, सोसायटीधारक प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत मांडलेल्या विविध तक्रारींमधील बहुतेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत आमदार लांडगे यांच्यासमोर सोसायटीधारकांनी अनेक तक्रारी आणि समस्या मांडल्या होत्या. त्यापैकी काही समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच, इतर समस्या सोडवण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. याबाबत कृतज्ञता म्हणून सोसायटीधारकांच्या प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांची भेट घेवून आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.