Alandi: नववर्षानिमित माऊलींच्या मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – दि.1 जानेवारी रोजी नववर्षा निमित्त आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शना करिता हजारो भाविकांचे आगमन झाले होते.

माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी पहाटे पासूनच मंदिरातील दर्शनबारी भाविकांनी पूर्णपणे भरलेली होती. (Alandi) सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठीसुध्दा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे आनंदाचे व समाधानाचे भाव दिसून येत होते.

मंदिरामध्ये सकाळी ह.भ.प. नारायण महाराज जाधव यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली. मंदिरामध्ये भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरातील हार, फुले, प्रसाद व धार्मिक साहित्यांची वस्तूंची दुकाने सजली होती. त्या दुकानांमध्ये भाविकांची त्या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत होती. इंद्रायणी नदी घाटावरती (Alandi) सुध्दा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नववर्षा निमित्त ग्रामस्थांनी ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी ग्रामदेवतांच्या मंदिरा मध्ये गर्दी केली होती.

Alandi

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.