Chinchwad : चिंचवडमध्ये हजारों गणेशभक्तांनी घेतला ‘नमो चहा’ सेवेचा लाभ

एमपीसी न्यूज   – गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात शहरात सर्वत्रच गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. चिंचवड येथे बाप्पांच्या या विसर्जन मिरवणूकीत आलेल्या गणेशभक्तांसाठी ‘नमो चहा’ सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेचा तब्बल १० हजार भाविकांनी लाभ घेतला असल्याची माहिती आयोजक भाजपाचे नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड महापालिका भाजपाचे नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी चिंचवड येथील चापेकर चौकात येणाऱ्या गणेश भक्तासाठी ‘नमो चहा’ची मोफत सोय केली होती.  यासाठी त्यांनी तब्बल १ हजार लिटर दुधाचा चहा बनविला होता. गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान ‘नमो चहा’च्या सेवेचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला. आलेल्या गणेशभक्तांची अशा प्रकारे सेवा करून अत्यंत समाधान वाटले असल्याचे आयोजक नगरसेवक शितल शिंदे यांनी सांगितले. यंदाचे गणेशभक्तांच्या सेवेचे हे पाचवे वर्ष असून जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ही सेवी अशीच अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1