BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : बंगल्याच्या खिडकीवाटे चोरट्याने पळवले लाख रुपयांचे सामान

एमपीसी न्यूज – बंगल्याच्या स्लायडिंगच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यावाटे चोरट्यांनी हॉल आणि बेडरूममधील एक लाख 15 हजार रुपये किमतीचे सामान आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 1) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.

अभिजित गणेश गायकवाड (वय 30, रा. बावधन खुर्द, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित त्यांच्या घरी झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची स्लायडिंगची खिडकी उघडून बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांनी हल्ला आणि बेडरूममधून रोख रक्कम आणि सामान असा एकूण 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी अभिजित झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3