Pimpri : पत्र्याची टपरी फोडून हजारोंचे परफ्युम चोरीला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी अत्तर आणि परफ्युमची टपरी फोडून 34 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना नेपाळी मार्केट शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट पिंपरी येथे घडली.

मुर्तूज अरिफ शेख (वय 22, रा. हनुमान सोसायटी, तळवडे रोड, रुपीनगर, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे पिंपरी मधील नेपाळी मार्केटशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटमध्ये ताज अत्तर आणि परफ्युम नावाचे दुकान आहे. गुरुवारी (दि. 13) रात्री सातच्या सुमारास शेख यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील महिंद्रा स्कॉर्पिओ कारची मॅक व्हील, परफ्युम आणि रोख रक्कम असा एकूण 34 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.