रविवार, जानेवारी 29, 2023

Eknath Shinde : फक्त 5 रुपयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी???

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ठार मारण्याचा धमकीचा फोन आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. राज्याची सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली होती. संपूर्ण राज्याचे टेन्शन या एका फोनने वाढलं होतं. मात्र त्यानंतर ही माहिती खोटी असल्याचे पुढे आले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्ला करणाऱ्या कटाची माहिती देणारा फोन करणाऱ्या तरुणाला लोणावळा पोलिसांनी अटक केली. अविनाश वाघमारे असं त्याचे नाव आहे. हे सर्व करण्यामागील त्याने सांगितलेलं कारण ऐकून मात्र सर्वांना धक्काच बसला. अवघ्या पाच रुपयासाठी त्याने हे सर्व कृत्य केलं होतं.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, आरोपी अविनाश वाघमारे हा लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्या ठिकाणाहून त्याने पाण्याची बाटली विकत घेतली होती. दहा रुपये किंमत असणाऱ्या या बॉटलचे हॉटेल मालकाने पंधरा रुपये लावले होते. याचाच राग मनात धरून प्रशांत वाघमारे यांनी हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने पोलिसांना फोन करून मुख्यमंत्र्यांना ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे अशी खोटी माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Latest news
Related news