BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : पाचशे रूपयांसाठी मारून टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज – दुकानात घुसून तरूणाच्या गळ्याला कोयता लावून पाचशे रूपये दे, अन्यथा मारून टाकीन, अशी धमकी देत त्रिकुटाने पाचशे रूपये जबरदस्तीने नेले. ही घटना देहूरोड येथे शुक्रवारी घडली.
याप्रकरणी सद्दाम अहमद कुरेशी (वय 21, रा. गांधीनगर, देहूरोड) याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक पप्पू पोडे व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दामचे देहूरोडमध्ये मटन विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता आरोपी सद्दामच्या दुकानात आले. सद्दामच्या गळ्याला कोयता लावून पाचशे रूपये दे अन्यथा मारून टाकू, अशी धमकी देत हाताने मारहाण केली. त्याच्याकडून जबरदस्तीने पाचशे रूपये नेले. फौजदार शिंदे तपास करत आहेत.
.