Hinjwadi : व्यवस्थापकाला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – शोरूमच्या जवळ विना परवाना खोदाई करून शोरूममध्ये जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण केल्याचा जाब विचारणार्‍या मॅनेजरला टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता बाणेर येथे घडली.

बाजीराव दत्तोबा चांदेरे (वय-47, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश बाजीराव इंगवले, सलोनी गणेश इंगवले, चेतन अंकुश बालवडकर, ओंकार राजेंद्र चांदेरे, मनिषा राजेंद्र चांदेरे, ट्रक चालक गौतमचंद दुधन, जेसीबी ऑपरेटर प्रकाश शिवशरण आप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बाणेर येथे सर्व्हे नं. 98 येथे 51 गुंठे जमीन आहे. या जमिनीमध्ये आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमविला. फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्या शेतात ट्रकमधून माती आणून टाकली.  जेसीबीने विना परवाना खोदाई करून  शोरूमकडे जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण केला. तसेच शोरूमच्या मॅनेजरला जिवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देंडगे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.