Pune Crime News : मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार आणि मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांना फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. पुणे पदवीधर मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

या मतदार संघातून भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड, तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेक जण निवडणुक लढवित आहे.

ही निवडणूक भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे. या मतदार संघातून यापुर्वी दोन वेळा भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

याच दरम्यान पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांना सातारा येथून लबाडे असे आडनाव सांगत एका व्यक्तीने फोन करून, ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,’ अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे.

या धमकीच्या विरोधात रूपाली पाटील यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.