Bhosari : शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज – शिक्षकाला शिवीगाळ करत गचांडी पकडून हाताने व चप्पलने मारहाण केली. तसेच कमरेला लावलेल्या पिस्तूलला हात लावून ‘बाहेर ये तुला गोळ्याच घालतो’, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास भोसरीतील स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिर येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी यशवंत बाबासो बाबर (वय 64) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजीव रामचंद्र बाबर (वय 40, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव बाबर हे इंद्रायणीनगर येथील स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी शाळेत आलेल्या आरोपी यशवंत बाबर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांची गचांडी पकडून हाताने, चप्पलने मारहाण केली. तसेच बाहेर ये म्हणत तुला गोळ्याच घालतो, अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.