Talegaon : राष्ट्रवादी पदाधिका-याच्या भावाला मारण्याची धमकी

1,106

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विकी लोखंडे यांच्या भावाला फोन करुन मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आज (सोमवारी) दुपारी दोनच्या सुमारास मोहननगर, तळेगाव स्टेशन येथे घडला.

विशाल साहेबराव लोखंडे (वय 25, रा. मोहननगर, अवधूत अपार्टमेंट, तळेगाव स्टेशन, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष अरुण खिलारे (रा. लोकमंगल बँकेशेजारी, मारुती चौक, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याने विशाल यांच्या मोबाईल फोनवर फोन केला. फोनवरून संतोष याने विशाल यांना ‘तुझे वाटोळे करतो, तुला बघून घेतो.’ अशी धमकी दिली. त्यानंतर संतोषने विशाल यांच्या पत्नीच्या मोबाईल फोनवर फोन करून त्यांना भडकवले तसेच ‘तुझ्या नवऱ्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विकी लोखंडे यांनी भावाच्या जीवाला धोका असून पोलिसांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र पोलिसांना दिले आहे.

HB_POST_24_Oct
HB_POST_END_FTR-A3
%d bloggers like this: