Pimple Gurav News : गाडीची काच फोडून दिली धमकी

एमपीसी न्यूज – स्वतःच्याच भाडेकरुच्या गाडीची काच फोडून हा सारा प्रकार पाहणाऱ्या महिलेला बघून घेण्याची धमकी देत विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्यावर (Pimple Gurav News) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथील आदर्शनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला.
याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पंडित मोतीलाल कवडे (रा.पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Talegaon Dabhade : श्रीदत्त जयंती सोहळ्याचे आयोजन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची गाडी व आरोपी यांची आय टेन कार या रोडच्या कडेला समोरासमोर पार्क केलेल्या होत्या. यावेळी आरोपीने भाडेकरूच्या गाडीची पाठीमागची काच पोडून नुकसान केले. यावेळी फिर्यादी यांचे कडे पाहून तुझ्या बापाचा रस्ता आहे का, (Pimple Gurav News) तुमचा आम्हाला त्रास होत आहे.आमच्या नादी लागयचा नाही, तुला पाहून घेईन, तु कुठेही कम्प्लेंट कर माझ कोणी वाकड करु शकत नाही, अशी धमकी देऊन हाताने अश्लिल हातवारे करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.