Pimpri Crime : ‘ब-या बोलाने मला सोडा नाहीतर परिणाम वाईट होतील’; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना धमकी

सराईत गुन्हेगार असलेल्या दारू विक्रेत्याला अटक

एमपीसी न्यूज – ‘मी एकटाच दारूचा धंदा करतो काय, तुमचा मला पकडण्याचा काय संबंध, ब-या बोलाने मला सोडा नाहीतर परिणाम वाईट होतील’ अशी अवैधरित्या गावठी दारू विक्री करणा-या एका दारू विक्रेत्याने पोलिसांना धमकी दिली. तसेच हात उगारून पोलिसांच्या अंगावर धावून आला. पोलिसांनी सराईत गुन्हेगार असलेल्या दारू विक्रेत्याला अटक केली आहे.

विष्णू सुभाष सुळ (वय 32, रा. नढेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विष्णू गौतम भारती यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिसांना रविवारी (दि. 22) रात्री माहिती मिळाली की, निराधारनगर झोपडपट्टी, पिंपरी येथील शंकराच्या मंदिराजवळ एक व्यक्ती बेकायदेशीरपणे दारू विक्री करीत आहेत. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली असता आरोपी सुळ हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विकत होता.

पोलिसांनी सुळ याला पकडून त्याच्याकडून 2 हजार 500 रुपयांची 35 लिटर दारू जप्त केली. त्यावेळी सुळ याने आरडाओरड करून ‘मी एकटाच दारूचा धंदा करतो काय, तुमचा मला पकडण्याचा काय संबंध. ब-या बोलाने मला सोडा नाहीतर याचे परिणाम वाईट होतील’ अशी पोलिसांना धमकी दिली. अशी पोलिसांना धमकी दिली. पोलिसांवर हात उगारून मारण्यासाठी धावून येत झटापट करत त्याने पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ओरपी विष्णू सुळ याच्या विरोधात यापूर्वी चिखली, निगडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, चिंचवड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सहा अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1