Hinjewadi Crime News :’तू केस मागे घे नाहीतर जीवे मारीन’ असे म्हणत महिलेचा विनयभंग

विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘तू केस मागे घे नाहीतर जीवे मारीन’ असे म्हणत महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (दि.25) सायंकाळी पाचच्या सुमारास सुसगावात ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

श्रीकांत ससार (वय 30, रा. सुसगाव) व गोकुळ जाधव (वय 27, रा. सुसगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, कल्पना ससार (वय 45, रा. सुसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडित महिलेने मंगळवारी (दि.25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला जुन्या केस बाबत चर्चा करण्यासाठी घरी बोलावले. आरोपी गोकूळ महिलेच्या अंगावर धावून गेला व ‘तू केस मागे घे नाहीतर जीवे मारीन’ अशी धमकी दिली. तसेच, महिलेचा विनयभंग केला. महिलेनं आरडाओरडा केल्यावर इतर दोघांनी तिला मारहाण केली असं फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.