Wakad News : जीवे मारण्याची धमकी देत मागितला दहा हजारांचा हप्ता

एमपीसी न्यूज – फर्निचरच्या दुकानात येऊन जीवे मारण्याची धमकी देत प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 19) रात्री वाकड हिंजवडी रोडवर मानकर चौकात घडला.

तुषार मानकर, प्रदीप जगताप (दोघे रा. कस्पटे वस्ती, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हिम्मत चैनाराम सोलंकी (वय 34, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोलंकी यांचे मानकर चौकात व्ही एस फर्निचर नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मोठा भाऊ प्रकाश सोलंकी दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. महिन्याला दहा हजार रुपये दे नाहीतर तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.