Crime News : कोर्टात केलेली केस मागे घेण्यासाठी डोक्याला बंदूक लावून धमकावले

एमपीसी न्यूज – कोर्टात केलेली केस मागे घे म्हणत थेट डोक्याला बंदूक लावून धमकावल्याचा प्रकार मुळशी येथे घडला आहे. हा प्रकार 3 जानेवारी 2022 ते 10 जुलै 2022 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी वसंत धोडिंबा साळुंखे (वय 50 रा.माणगाव मुळशी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोष अंकुश मोहिते, किशोर अंकुश मोहिते, अंकुश किसन मोहिते,एक अनोळखी व्यक्ती, ड्रायव्हर व दोन अंगरक्षक यांच्यावर हिंजवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांचा भाऊ अरूण धोंडिबा साळुंखे यांच्या मालकीची माणगाव येथे 75 आर जमिन आहे.या जमिनीचा विकसन करारनामा करायचा आहे सांगून संतोष याने कुलमुखत्यार पत्र करून घेतले.तसेच कामासाठी फोटो लागत आहेत म्हणून कोऱ्या कागदावर सह्या व अंगठे घेऊन त्या अधारे फिर्यादी यांची 20 आर जमिन परस्पर स्वत:च्या नावाने करून घेतली. त्याचा कोणताच मोबदला न देता फसवणूक केली.यावरून कोर्टात आरोपी विरोधात केस केली.हिच केस मागे घेण्यासाठी फिर्यादी यांना रस्त्यात आरोपीने अडवून दमदाटी केली.

केस मागे घेण्यात फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या डोक्याला बंदूक लावली व गाडीत बसण्यास सांगितले.फिर्यादी यांना बळजबरी गाडीत बसवून निर्जनस्थळी घेऊन जाऊन हाताने मारहाण करत, माझे या कोर्ट केस प्रकरणात 50 लाखांचे नुकसान झाले आहे, ते पैसे व त्याचे व्याज 10 लाख असे 60 लाख रुपये दे अशी खंडणीची मागणी केली.तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.