Wakad : लॉटरी सेंटर चालकाला धमकी

एमपीसी न्यूज – लॉटरी विक्रीच्या कारणावरून तीन जणांनी लॉटरी सेंटरमध्ये घुसून चालकाला धमकी दिली. ही घटना बुधवारी (ता. 31) सायंकाळी भूमकर चौक, वाकड येथे घडली.

पंकज भारत जगताप (वय 30, रा. ताथवडे रोड, बालाजी लॉ कॉलेजसमोर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप यांचे वाकडच्या भूमकर चौकात जगताप लॉटरी सेंटर नावाचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ते दुकानात असताना तोंडावर रुमाल बांधलेले तिघेजण आहे. लॉटरी विक्रीच्या कारणावरून बाचाबाची करून शिवीगाळही केली. तसेच हल्ला करून दुखापत करण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.