Pune News : मुलगी झाली तर घटस्फोट देण्याची धमकी, पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : माहेरून पैसे आणण्यासाठी आणि मुलगी झाली तर घटस्फोट देईन अशी धमकी देत एका विवाहित महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात हा प्रकार घडला.

पति प्रेमकुमार पंढरीनाथ गायकवाड त्याच्यासह सासू-सासरे आणि दीरा विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 28 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की 16 जून 2019 पासून हा प्रकार सुरू होता. फिर्यादी महिलेचे पती सासू-सासरे आणि दीर तिला माहेरून पैसे घेऊन यावे यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. तसेच मुलगी झाली तर घटस्फोट देईन अशी धमकीही त्यांनी तिला दिली होती. याशिवाय पतीने लैंगिक अत्याचार केल्याची ही तक्रार पीडित महिलेने दिली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.