Pune News : लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर ॲसिड टाकण्याची धमकी

तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीच्या चेहर्‍यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली. तसेच या तरुणीच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर अरुण बाबासाहेब खडतरे या तरुणाविरोधात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी आणि आरोपीची तोंडओळख आहे. त्याचाच फायदा घेऊन आरोपी 20 ऑक्टोबर रोजी या तरुणीच्या घरी गेला. त्याठिकाणी त्याने या तरुणीचा विनयभंग करत तिच्या आई-वडिलांना ढकलून दिले तसेच लग्न नाही केले तर वडिलांना ठार मारू आणि तुझ्या अंगावर ॲसिड टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने घरातील साहित्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.