Pune Crime News : परवाना नूतनीकरणासाठी लाच घेताना जिल्हा शल्यचिकित्सकासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज – शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी 40 हजाराची लाच मागून 12 हजारांची लाच स्विकारताना औंध येथील जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकासह, सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी यांनी अटक (Pune Crime News) केली.

महादेव बाजीराव गिरी (वय 52), डॉक्टर माधव बापूराव कनकवळे ( वय 50), आणि संजय सिताराम कडाळे (वय 45) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.संशयित आरोपी महादेव गिरी हा प्रशासकीय अधिकारी,  डॉ. माधव कनकवळे हा शल्यचिकित्सक,तर संजय कडाळे लिपीक तसेच सहाय्यक अधीक्षक आहेत.

त्यांच्याकडील सोनोग्राफी सेंटरच्या नुतनी करण्याचे काम सोपविण्यात आले होते. या सेंटरचे प्रमाणपत्राचे नुतनीकरण परवाना देण्यासाठी लिपीक संजय कडाळे याने गिरी आणि डॉ. माधव कनकवळे यांच्यामार्फत 40 हजारांची लाचेची मागणी केली होती.

Thergaon News : थेरगावमध्ये झाड पडल्याने नागरीकांच्या कामात व्यत्यय

तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.त्यावरुन 6 जून रोजी सापळा रचून 12 हजारांची लाच घेताना तिघांना अटक (Pune Crime News) करण्यात आली.तिघांवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर, हवालदार नवनाथ वाकळे, अंकुश माने,पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.