Pune Crime News : युट्युबवर पाहून ते चोऱ्या करायचे, पुणे जिल्ह्यातील एटीएम फोडणारी टोळी जेरबंद; दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दहा लाख रुपयाचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अजय रमेशराव शेंडे, शिवाजी उत्तम गरड आणि ऋषिकेश काकासाहेब कीर्तीके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोलापूर रस्त्यावरील यवत गावाजवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून आरोपींनी 23 लाख 80 हजार रुपये चोरून नेले होते. विशेष म्हणजे आरोपींनी युट्युब वर पाहून घरफोडी आणि एटीएम कसे फोडायचे याची माहिती गोळा केली होती. त्यासाठी लागणारे साहित्य त्यांनी ऑनलाइन मागवले होते.

चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यवत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तेव्हा त्यांना काही संशयित दुचाकीने जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक परिसरात अधिक माहिती मिळून तीन आरोपींना पकडले. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.

यातील आरोपी ऋषिकेश कीर्तीके याच्या भावाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्या लातूरमधून सोडविण्यासाठी आरोपींना पैशाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी चोरी करण्याचा प्लान आखला. चोरी कशी करावी याची माहिती त्यांनी युट्युबवरून घेतले. साहित्यही ऑनलाइन मागवले आणि चोऱ्या केल्याचे कबूल केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.