Pune : ‘भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट मॅच’चे बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – भारत-वेस्ट इंडीज या दोन देशात सुरु असलेल्या टी 20 क्रिकेट मॅचचे बेटिंग घेणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी बुधवारी (दि. 11) छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 67,870 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.

प्रवीण झुबरलाल पटवा (वय ६४), देवेश प्रवीण पटवा (वय ३०, दोघेही रा. लालबाग हौसिंग सोसायटी, डी ,मार्केट यार्ड, पुणे ३७) आणि राजेंद्र मलीन चोरगे (वय ५४, रहा. २९१, नाना पेठ, भाजी मंडईजवळ पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिसांना खबऱ्यांकडून स्वारगेट पोलिसांना प्रवीण झुबरलाल पटवा याच्या घरी भारत-वेस्ट इंडीज या दोन देशात सुरु असलेल्या टी २० क्रिकेट मॅचचे बेटिंग घेत असलेली माहिती मिळाली. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी प्रवीण पटवा याच्या रा. लालबाग हौसिंग सोसायटी, डी ,मार्केट यार्ड, पुणे ३७ येथील घरी छापा टाकला.

यावेळी प्रवीण पटवा यांच्यासह देवेश प्रवीण पटवा आणि राजेंद्र मलीन चोरगे हे तिघेजण टी २० क्रिकेट मॅचचे बेटिंग घेत असल्याचे दिसते. याप्रकरणी त्यांना गुरुवारी (दि. १२) अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम १३ ८७०, सहा मोबाईल,एचपी कंपनीचा लॅपटॉप, एक तोशिबा कंपनीचा एलईडी टीव्ही तसेच इतर साहित्य असे एकूण सुमारे ६७,८७० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.