Chakan Crime News : गुटख्याचा अवैध साठा करणारे तीन जण अटकेत

3.39 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – विक्री करण्याच्या हेतूने गुटख्याचा अवैध साठा करणा-या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.12) दावड मळा, सावतामाळी मंदीर, चाकण याठिकाणी हि कारवाई केली. पोलिसांनी 3.39 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

अभिषेक उमेशचंद्र गुप्ता (वय 22, रा. अंबेठाणचौक, चाकण), अनमोल समोद शर्मा (वय 21, रा. अंबेठाणचौक, चाकण) आणि संतोष शर्मा (वय 39) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक महेश विनायक बारकुले (वय 37) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्री करण्याच्या हेतूने तंबाखूजन्य पदार्थ गुटख्याचा अवैध साठा केला होता. ते एमएच 12/ एनसी 7293 व एमएच 14 जीपी 9057 या दुचाकीवर साठवलेला माल ठेवत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 2 लाख 65 हजार 901 किंमतीचा गुटखा, 2,060 रोख रक्कम, दोन मोबाईल फोन व दोन दुचाकी असा एकूण 3 लाख 39 हजार 961 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.