Pune Crime News : बिबवेवाडी येथील 14 वर्षीय मुलीच्या खून प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज – बिबवेवाडी येथील 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीनं तपास करून, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. चिंचवड) असे या मुख्य आरोपीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सराव करत असलेल्या 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली.

एकतर्फी प्रेमातून नात्यातील मुलानंच हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. आरोपी पाच वर्षांपासून मृत मुलीच्या शेजारी राहत होता, तर इतर आरोपी हे सोबत आले होते. आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास आलेले नाही. दोन-तीन दिवस आधी ही आरोपी मुलं मैदानात रेकी करून गेली होती, असंही गुप्ता यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्य आरोपील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात हजर करण्यासाठी नेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.