Pune : खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी तिघांना चंदननगर पोलिसांनी पकडले आहे. खरडी येथे तस्करीसाठी हे मांजर आणले होते.

_MPC_DIR_MPU_II

जितेंद्र शिवराम मोहिते, कुमार यशवंत सावंत आणि योगेश यशवंत सावंत अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोकणातून हे खवले मांजर विक्रीसाठी आणले होते. हे मांजर विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या मांजराचे वय तीन वर्षे असून साडेआठ किलो वजन आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1