Pune News : बोंड्याच्या चुऱ्याची साठवणूक करून विक्री केल्याप्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज : अफीम या अंमली पदार्थाच्या बोंड्याचा चुऱ्याची (दोडाचुरा/पॉपीस्ट्रॉ) साठवणूक करून त्याची विक्री करणाऱ्यांचा पुणे पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सव्वा सहा किलो अफिमचा चुरा जप्त केला आहे.

महेश हरमलराम बिष्णोई (वय 30, रा. काळेपडळ, मुळ. राजस्थान), विकास प्रधानराम डारा (वय 20, रा. सासवड) आणि सिद्धार्थ धनपाल पाटील (वय 32, रा. सासवड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर व त्यांच्या पथक गस्त घालत असताना त्यांना हडपसरमध्ये महेश बिष्णोईबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडे अफीमच्या 1 किलो 594 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ मिळून आला.

चौकशीत त्याने हा पॉपीस्ट्रॉ विकास डारा याने दिल्याचे सांगितले. पोलीसांनी सासवडमध्ये डारा याच्या घरावर छापेमारी केली. पोलीसांना पोत्यात 2 किलो 534 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ मिळून आला. त्याच्या चौकशीत त्याला हा पॉपीस्ट्रॉ पाटील याने दिल्याचे सांगितल्यानंतर पोलीसांनी पाटील याच्या घरावर छापेमारी केली. त्याच्या घरात पावणे दोन किलो पॉपीस्ट्रॉ मिळून आला.

त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यांना हा अमली पदार्थ दिलेला मुख्य आरोपी याचा शोध सुरू आहे. पाटील हा डाराला देत होता. तर, डारा हा छोट्या विक्रेत्यांना देत असत. त्यानंतर बिष्णोई हा त्याच्या ग्राहकांना पॉपीस्ट्रॉ विकत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीसांकडून चौकशी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.