Chikhali Crime News : बेकायदेशीर गुटखा, पान मसाला वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे गुटखा, पान मसाला वाहतूक करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या वतीने शुक्रवारी (दि.1) कुदळवाडी, चिखली याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

इमरान तबारक खान (वय 19, रा. कुदळवाडी, चिखली), शफीउल्ला सोहेल खान ( वय 23, रा. आकुर्डी) व विजयकुमार राजमन गोंड (वय 34, रा. चिखली) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई मारूती व्यकंटराव जायभये यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे पान टपरीधारक आहेत. त्यांना विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे गुटखा, पान मसाला वाहतूक करून घेऊन जाताना अटक करण्यात आली.

चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक एस. पी. देशमुख याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.