Dighi : खंडणी प्रकरणात दिघीतील बापलेक अटकेत

एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवर आरएमसी टाकण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करत 45 हजारांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार दिघी येथे घडला. बांधकाम साइटवर काँक्रिटचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून तीस हजारांची खंडणी घेत  फोनवर एक लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी तिघा बाप लेकांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मागील पाच महिन्यांपासून 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत काळजेवाडी  च-होली बुद्रुक येथील अवनी आवास या बांधकाम साइटवर घडला. 

सत्यवान ज्ञानेश्वर तापकीर (वय 46), आकाश सत्‍यवान तापकीर (वय 25), सागर सत्यवान तापकीर (वय 23, तिघे रा. काळजेवाडी, चऱ्होली) अशी अटक केलेल्या बाप लेकांची नावे असून याप्रकरणी मनोज नरेश गुप्ता (वय 44, रा. प्राधिकरण निगडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची काळजेवाडी येथे अवनी आवास नावाची बांधकाम साईट सुरू आहे. या बांधकाम साइटवर आरएमसी कॉन्ट्रॅक्टर चव्हाण आरएमसी मटेरियल पुरवतात. फिर्यादी यांच्या बांधकाम साइटवर मटेरियल टाकण्यासाठी आरोपींनी आरएमसी कॉन्ट्रॅक्टर चव्हाण यांना पन्नास हजारांची खंडणी मागितली तसेच दमदाटी करून चव्हाण यांच्याकडून 45 हजार रुपयांची खंडणी घेण्यात आली.

फिर्यादी यांच्या बांधकाम साइटवर हरीश पटेल हे काँक्रिटचे काम करतात. आरोपी आकाश याने पटेल यांना धमकी देऊन 30 हजारांची रक्कम घेतली. 10 सप्टेंबर रोजी आरोपी सत्यवान याने पटेल यांना फोन करून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गाड्या तोडफोड करण्याची व साइटवर येऊ न देण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहेअसून दिघी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.