Bhosari : ‘रस्त्यावर गाडी का लावली’ असे म्हणत चाकू व लोखंडी रॉडने तिघांना मारहाण

Three beaten over vehicle parking issue.

एमपीसी न्यूज – ‘गाडी रस्त्यावर का लावली’, असे म्हणत दोघांनी चाकू व लोखंडी रॉडने तिघांना मारहाण केली. यात मारहाण झालेले दोघे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री भोसरी एमआयडीसी येथे घडली.

महेबूूब मन्सून मौजन (वय 45, रा. मोहम्मद पनाह मोहल्ला, ता. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तसेच अबुहुरेरा रफिक मौजन व मुनीर नजीर मौजन भोसरी एमआयडीसीत टेल्को रोडवर एका कंपनीबाहेर गाडी लावून थांबले होते.

गाडीच्या केबीनमध्ये ते जेवण करीत होते. त्यावेळी दोन अनोळखी आरोपी तिथे आले. त्यांनी ‘गाडी रस्त्यावर का लावली’, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मुनीर मौजन यास हाताने मारहाण केली.

आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मालकाचा मुलगा अबुहुरेरा यांना चाकू व लोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते जखमी झाले.

भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.