Pimpri: वाहन चोरीचे सत्र सुरुच; पिंपरी, भोसरी, एमआयडीसी परिसरातून तीन दुचाकी चोरीला

Three bikes were stolen from Pimpri, Bhosari, MIDC area गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज वाहन चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. मात्र, हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. वाहन चोरटे शहरात पुन्हा सक्रिय झाले आहेत. बुधवारी पिंपरी, भोसरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तीन वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीची पहिली घटना 19 जून रोजी गवळीमाथा, भोसरी येथे घडली. संदीप अशोक धोत्रे (वय 30, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. 24) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी फिर्यादी धोत्रे हे काही कामानिमित्त गवळीमाथा भोसरी येथे रात्री आठ वाजताच्या सुमारास आले होते.

त्यांनी आपली 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14 एचझेड 9287) पार्क केली. काम उरकून ते अवघ्या काही मिनिटांमध्ये परत आले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पोलीस नाईक भोर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना पुणे नाशिक महामार्गावर भोसरी येथे 21 जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. ऋषीकेश हरी कळसाईत (वय 24, रा. सद्‌गुरूनगर, भोसरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

भीमाशंकर महादेव इंगळे (वय 29, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल रोजी फिर्यादी भीमाशंकर इंगळे यांनी आपली 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14 इबी 9348) ही दुचाकी पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी येथील साईबाबा टिव्हीएस सर्व्हिस सेंटर समोर उभी केली होती.

दि. 21 जून रोजी त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची तिसरी घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे मंगळवारी दुपारी घडली. लक्ष्मण नारायण डोंगरे (वय 42, रा. असम सोसायटी, संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डोंगरे यांनी आपली 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14 एचव्ही 7203) मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरासमोर उभी केली होती.

अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. सायंकाळी पाच वाजता हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.