Pune Crime News : रविवार पेठेतील ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांकडून तब्बल 3 किलो सोने लंपास

एमपीसी न्यूज – पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवार पेठेतील एका ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी मुंबईच्या सराफ व्यावसायिकाचे तब्बल 3 किलो सोने लंपास केले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. पुण्याच्या मध्यवस्तीत घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

फरासखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी सराफा व्यावसायिक जिनेश बोराणा (वय 33) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लहान मुलगा आणि दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबईतील असून त्यांचा सोने – चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. आज दुपारच्या सुमारास ते रविवार पेठेतील एका सराफ ज्वेलर्सकडे आले होते. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगांच्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये 3 किलो 139. 40 ग्रॅम सोने होते. याचवेळी या दुकानात खरेदीसाठी दोन महिला व लहान मुलगा अशा तीन व्यक्ती खरेदीसाठी आल्या. दरम्यान, काही कळायच्या आतच त्यांनी तब्बल सव्वातीन किलो सोने असणारा बॉक्स लंपास केला. त्याची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.