Wakad Crime News : पादचाऱ्याला धक्काबुक्की करत मलेशिया देशातील ड्रायव्हिंग लायसन्स पळवले

एमपीसी न्यूज – तीन चोरट्यांनी एका पादचाऱ्याला धक्काबुक्की करून लुटले. पादचा-याकडील मलेशिया देशातील ड्रायव्हिंग लायसन्स आणि अन्य ऐवज चोरून नेला आहे. ही घटना भुमकर चौक, वाकड येथे शुक्रवारी (24) मध्यरात्री घडली.

अमित अशोक अकोलकर (वय 45, रा. भुमकर चौक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास फिर्यादी घरी चालले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादी अकोलकर यांना रस्त्यात अडविले. शिवीगाळ व धक्काबुक्की करत त्यांच्या खिशातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच मलेशिया देशाचे ड्रायव्हिंग लायसन, एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले.  याप्रकरणी वाकड पोलीस आणखी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.