Talegaon Crime News : ‘मी इथला भाई आहे’ म्हणत तरुणावर तलवारीने खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – मी इथला भाई आहे, तुला माहित नाही काय, असे म्हणत कारमध्ये बसलेल्या एका तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री यशवंतनगर, तळेगाव स्टेशन येथे घडली. तरुणाने तलवारीचा वार हुकवून घरात पळ काढल्यानंतर आरोपींनी कारच्या काचा फोडून नुकसान केले.

वैभव विटे, बंटी भालेराव, जय भालेराव (सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 308, 427, 506, 34, आर्म ऍक्ट 4 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओमकार सचिन भांडलकर (वय 19, रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर कारमध्ये बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी तिथे आले. त्यांच्या हातात तलवार, बेसबॉल दांडके होते. ‘मी इथला भाई आहे, तुला माहित नाही काय, असे वैभव याने म्हटले.

फिर्यादी यांनी कारची काच खाली घेऊन डोके बाहेर काढले असता आरोपी वैभव याने फिर्यादी यांचा जीव जावा या उद्देशाने त्यांच्या डोक्यात तलवार मारली. मात्र फिर्यादी यांनी डोके आत घेऊन कारच्या दुस-या दरवाजातून उतरून घरात गेले. आरोपींनी कारच्या सर्व काचा फोडून नुकसान करून निघून गेले. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.