Wakad Crime News : वाकड, देहूरोड, हिंजवडीत तीन घरफोड्या; आठ लाखांचे दागिने, रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – वाकड, देहूरोड, हिंजवडी परिसरात घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या. या तिन्ही घटनांमध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण आठ लाख 14 हजार 714 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 16) अज्ञातांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात विवेक नथुराम जाधव (वय 32, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी चोरटयांनी फिर्यादी यांच्या घरातून 99 ग्रॅम सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम चांदीचे साहित्य, तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख सात हजार 714 रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी हे गावी गेले असताना हा प्रकार घडला आहे.

देहूरोड पोलीस ठाण्यात संभाजी दादाभाऊ काकडे (वय 53, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 14) दुपारी पाच ते रविवारी (दि. 15) रात्री आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातून 92 हजारांचे सोन्याचे दागिने, 40 हजार रोख रक्कम असा 1 लाख 32 हजारांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात किशोर शालीग्राम घुले (वय 45, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (दि. 12) पहाटे पाच ते शनिवारी (दि. 14) सकाळी सात वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून तीन लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.