Chikhali : डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिकांना कोणतेही बिल न देता औषध देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 19) देहू आळंदी रोडवरील चिखली येथे घडली.

किरण रामहरक जैस्वाल / रोहिदास (रा. मनपा शाळेजवळ, नेहरूनगर, पिंपरी), प्रकाश रामलाल चौधरी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) आणि नारायण राठोड (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सचिन अशोक कांबळे (वय 44, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून Mephentermine Sulphate Injection IP हे औषध विना खरेदी बिलाने खरेदी केले. तसेच डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय ते औषध ग्राहकांना कोणतेही बिल न देता विक्री केले. याबाबत तिघांवर भारतीय दंड विधान कलम 175, 276, 336 तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.