Pune news: कोंढवा पोलिसांच्या रेकॉर्डवरील तीन सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाई

Three expert criminals from Kondhwa Police records externed for 2 years from Pune District.

एमपीसी न्यूज – कोंढवा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर असणाऱ्या तीन सराईत गुंडांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात. पुणे पोलीस दलातील परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ही कारवाई केली. 

मुकुल सुनील भंडारी (वय 26), क्रिप्शन लॉरेन्स परदेसी (वय 24) आणि रियाज शिराज शेख अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत.

या तीनही आरोपींची टोळी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सात गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केली असतानाही त्यांनी कोंढवा परिसरातील नागरिकांना दमदाटी करत लुटमार सुरू केली होती.

आरोपींचे गुन्हेगारी क्षेत्रातील रेकॉर्ड पाहून कोंढवा पोलिसांनी उपायुक्त नम्रता पाटील यांच्यासमोर त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार या तिघांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.