Pimpri: पोलीस आयुक्तालयाच्या फर्निचरसह स्थापत्य विषयक कामांसाठी तीन कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने सुरु झालेल्या पोलीस आयुक्तालयामध्ये फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तीन कोटी 47 लाख 3 हजार 923 रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (मंगळवारी)आयत्यावेळी मान्यता दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथून 15 ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरुपात झाला आहे. चिंचवड – प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे काम होणार असून तिथे फर्निचरसह स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या.

त्यासाठी तीन निविदा पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सोपान जर्नादनराव घोडके या ठेकेदाराची निविदा रकमेच्या तीन कोटी 87 लाख 62 हजार 189 मधून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्सेस वगळून तीन कोटी 86 लाख 50 हजार 150 पेक्षा 10.50 टक्के कमी दराची आली. ही निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने तसेच ठेकेदार मुदतीमध्ये काम मानांकनाप्रमाणे पुर्ण करुन देण्यास सक्षम असल्याने त्यांची निविदा स्वीकारण्यास अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी मान्यता दिली. त्यानुसार घोडके या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेससह तीन कोटी 47 लाख 3 हजार 923 रुपयांपर्यंत काम करुन घेण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.