Chinchwad News : शहरात चोरीच्या तीन घटना; लॅपटॉप, डुकरे, सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या निगडी, देहूरोड आणि चिखली परिसरातून लॅपटॉप, डुकरे आणि कारचा सायलेन्सर चोरीला गेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात ऋषभ विजय मांडवगडे (वय 25, रा. प्राधिकरण निगडी. मूळ रा. नागपूर) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून 20 हजार रुपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि. 21) सकाळी आठ ते सव्वानऊ वाजताच्या कालावधीत घडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

विनोद बलबीर चौंदे (वय 40, रा. श्रीकृष्णनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल महेंद्र रीडलान (वय 24, रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी डुकरे सांभाळली आहेत. 10 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेपाच वाजताच्या कालावधीत आरोपीने फिर्यादी यांच्या डुकरांच्या वाड्यातून 45 हजार रुपये किमतीची 25 डुकरे चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात दीपक धोंडू यादव (वय 47, रा. प्राधिकरण चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची इको कार सोमवारी (दि. 20) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचा 30 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 21) सकाळी उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.