Pune Accident News : पुण्यात सिंहगड, विमानतळ आणि लोणीकंद परिसरातील रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात (Pune Accident)  तिघांचा मृत्यू झाला आहे. सिंहगड, विमानतळ आणि लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत हे अपघात झाले. रोहित मोतीराम येवले (वय 22), रामेश्वर भांनारकर आणि एका अनोळखी तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. संबंधित पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-नगर रस्त्यावर हॉटेल आनंद मिसळ समोर अज्ञात चार चाकी चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून बाईकवर जाणाऱ्या रोहित येवले याला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने रोहितचा मृत्यू झाला. लोणीकंद पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन

दुसऱ्या एका घटनेत विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एअर फॉर्स स्टेशन लगत असणाऱ्या केंद्रीय विद्यालय जवळ रामेश्वर भानारकर हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना धडक (Pune Accident)  दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रामेश्वर यांचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरा अपघात हा सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुंबई बंगलोर महामार्गावर झाला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या 32 वर्षीय तरुणाला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी एका टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.