Chinchwad News : बिजलीनगरमध्ये तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : बिजलीनगर येथील गिरीराज हाऊसिंग सोसोयटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम असा एकूण तीन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली.

नवीनचंद्र तुळशीदास गिरमे (वय 50, रा. गिरीराज हाऊसिंग सोसायटी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरमे हे वाकड येथील माय कारमध्ये मॅनेजर पदावर नोकरी करतात. त्यांचे घर शनिवारी (दि. 2) रात्री सात ते रविवारी (दि. 3) सकाळी सहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून 59 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 470 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.