Hinjwadi : रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची साडेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पती रेल्वेत अधिकारी आहेत, तुम्हाला रेल्वेत नोकरी लावते, असे आमिष दाखवून एका महिलेने तीन तरूणांकडून साडेसात लाख रूपये उकळले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट 2018 ते 20 जून 2019 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी अक्षय रोहिदास भिंताडे (वय 25, रा. कासारसाई, मुळशी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्मिता लक्ष्मण मोहिते, महेश ऊर्फ बंडू जाधव (दोघे रा. न्यू. बॉम्बे हॉटेलच्या मागे, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्मिता मोहिते हिने मी सरकारी नोकरी करत असून माझे पती रेल्वेत अधिकारी असल्याचे फिर्यादी व त्याच्या दोन मित्रांना सांगितले. तिघांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने त्यांच्याकडून प्रत्येकी अडीच लाख रूपयाप्रमाणे साडेसात लाख रूपये उकळले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. फिर्यादीला आरोपींनी साडेसात लाख रुपयांचे धनादेश दिले; मात्र ते बाऊन्स झाले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.