Thergaon : कोयते हवेत फिरवून दहशत माजविणार्‍या तिघांना अटक, दोघे ताब्यात

एमपीसी न्यूज – एका तरूणाशी झालेल्या वादातून पाच जणांनी त्याच्या घराच्या परिसरात जाऊन कोयते हवेत फिरवून रहिवाशांना दमदाटी करून  दहशत माजविली. हा प्रकार थेरगावातील समता कॉलनी येथे गुरूवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोन अल्पवनीय मुलांना ताब्यात घेतले आहे.

प्रमोद गायकवाड, योगेश इंदुलकर, सौरभ चौधरी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विक्रांत चिंतामणी चव्हाण यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा अक्षय लोढे याच्याबरोबर वाद झाला होता. याच वादातून आरोपी अक्षयच्या घराबाहेर गेले. अक्षय ‘तुझ्यात दम असेल तर बाहेर ये’ असे म्हणून लोखंडी कोयते हवेत फिरविले. रहिवाशांना दमदाटी करून दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक स्वामी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.