Pimpri News : सिटी केअर, वेदांत हॉस्पिटलला तीन मिनी व्हेंटिलेटर भेट

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुणे तळेगांव यांच्या वतीने तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी यांच्या विशेष सहकार्याने क्लबचे माजी प्रांतपाल व कमला शिक्षण संकूलचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी पिंपरी येथील सीटी केअर हॉस्पीटल तसेच वेदान्त हॉस्पीटलला (शाहूनगर) तीन मिनी व्हेन्टींलेटर रुग्णसेवेसाठी भेट दिले.

डॉ. दीपक शहा यांच्या वतीने क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या हस्ते डॉ. अरविंद पाटील, डॉ. निलेश पाटील यांच्याकडे मिनी व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम आज (गुरुवारी, दि. 29) पार पडला.

व्हेंटिलेटर प्रदान सोहळ्यासाठी तळेगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षा प्रमिला वाळुंज, लिओच्या अध्यक्षा क्रांती वाळुंज, भोसरी क्लबचे अध्यक्ष संजय बिराजदार, माजी अध्यक्ष अनिल झोपे, जिल्ह्याचे सचिव परमानंद शर्मा आदी उपस्थित होते.

सध्या कोरोनाचा कहर वाढला असून रुग्णालयात अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. समाजातील दानशूर व्यक्तींनी शक्य ती मदत करण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच शासकीय पातळीवर देखील याबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्यात लायन्स क्लबने केलेली मदत रुग्णांसाठी अत्यंत उपयोगाची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.